0704 07 न्यायालयाचा अवमान खटला : बाल किशन गिरी विरुद्ध यूपी राज्य
मेरठ मध्ये सिताराम हॉस्टेल होतं. तिथे सुनील कुमार, पुनीत कुमार गिरी, सुधीर कुमार हे व इतर विद्यार्थी रहात होते. सुनील कुमार, पुनीत कुमार गिरी, सुधीर कुमार हे विद्यार्थी २३ मे २००८ रोजी अचानक गायब झाले. ते कुठेच सापडत नव्हते सुनील कुमारच्या भावाने, अनिल कुमार यांनी पोलिस स्टेशन मध्ये FIR दिली. २२ मे च्या रात्रीपासून सापडत ते नव्हते म्हणून २३ मे ला FIR दिली FIR दिल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्या तिघांचे मृतदेह सापडले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला. काही गुन्हेगारांना पकडण्यात आले. त्या गुन्हेगारांनी जामिनासाठी साठी जिल्हा न्यायालय मेरठ मध्ये अर्ज केला . परंतु कोर्टाने ते नामंजूर केले. त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
यादरम्यान बालकिशन गिरी हे एक वकील होते, पुनीत कुमार गिरी हा त्यांचा पुतण्या होता. १४ ऑगस्ट २००९ रोजी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी लिहिले की सगळे गुन्हेगार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आणि त्यांच्या बेकायदेशीर कामामुळे त्यांनी संपत्ती कमावली आहे. स्थानिक आमदार आणि माजी आमदार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. हायकोर्टामध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत. जे. एस. के. जैन, जे. व्ही. वर्मा, जे.एस.सी. निगम यांची नावे त्यात होती. त्यांना भीती होती की या लोकांना जमीन मंजूर होईल आणि न्याय मिळणार नाही.
उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली की , तुमच्याविरुद्ध तुमच्या विरुद्ध अवमान खटला का दाखल करू नये?
त्यानंतर २१.११.२००९ रोजी अपीलकर्त्याने बिनशर्त माफीनामा सादर केला आणि सांगितले की, मेरठ जिल्ह्यातील वकिलांनी आपली दिशाभूल केली होती आणि आपल्या पुतण्याची हत्या झाली असल्याने तो प्रचंड मानसिक तणावात होता म्हणून त्याने अर्ज पाठविला होता.
अपीलकर्त्याने उच्च न्यायालयाच्या ३ न्यायमूर्तींविरुद्ध केलेले आरोप अतिशय गंभीर, निंदनीय आणि कायद्याच्या वैभवाला आणि न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी पुरेसे आहेत आणि तेही कोणत्याही आधाराशिवाय आहेत. अपीलकर्ता प्रॅक्टिस करणारे वकील आहेत. इतर वकिलांनी आपली दिशाभूल केली आहे, अशी त्यांनी घेतलेली विनंती म्हणजे विचारोत्तर आहे.
No comments:
Post a Comment