बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. भारतातील बाललिंगगुणोत्तर २०११ मधील अंतिम सुधारित आकडेवारीनुसार ९१८ झाले आहे . त्यामुळे मुलींच्या निभावासाठी ,संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी २२ जानेवारी २०१५ला बेटी बचाओ , बेटी पढाओ अभियानाला सुरुवात झाली , हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात असून १६१ निवडक जिल्ह्यामध्ये बहुक्षेत्रीय कृतीतून राबविले जात आहे . या अभियानासाठी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हीला सदिच्छा दूत म्हणून निवडले आहे . महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जनगणनेच्या माहितीनुसार, भारतात, सन २०११ मध्ये, लहान मुलांचे लिंगोत्तर प्रमाण (० ते ६ वर्षे) १००० मुलांमागे ९२७ मुली असे होते. हरियाणातील बाललिंगगुणोत्तर सर्वात कमी (८३४) असल्यामुळे हे अभियान हरियाणातील पानिपतमधून सुरू करण्यात आले , १०० निवडक जिल्ह्यामध्ये हरियाणातील १२ , महाराष्ट्रातील १०(बीड,जळगाव,अहमदनगर,बुलढाणा ,औरंगाबाद,वाशीम,कोल्हापूर,उस्मानाबाद,सांगली,व जालना)पंजाबमधील ११,उत्तरप्रदेशातील १०,व जम्मू काश्मीरमधील ५ जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात आता ६१ जिल्हे जोडले आहेत यात गुजरातमधील ४ , हरियाणातील ८ , हिमाचल प्रदेशातील २,जम्मू काश्मीरमधील १०, मध्यप्रदेशातील २ , महाराष्ट्रातील (हिंगोली,सोलापूर पुणे,परभणी,नाशिक,लातूर) दिल्लीतील २ , पंजाबमधील ९,राजस्थानमधील ४,उत्तरप्रदेशातील ११, व उत्तराखंडमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. हे जिल्हे म्हणजे भारताच्या सरासरी बाललिंगगुणोत्तरापेक्षा कमी बाललिंगगुणोत्तर असलेले जिल्हे आणि किंवा सरासरीपेक्षा जास्त परंतु घट येत असलेले जिल्हे किंवा काही निवड जिल्हे असतात . युनिसेफने, सन २०१२ मध्ये, एका अहवालानुसार, या बाबतीत १९५ देशांमध्ये भारतास ४१वा क्रमांक दिला होता.[१][२]
या योजनेची सुरुवात ऑक्टोबर २०१४ मध्ये झाली. या योजनेत महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे एकत्रित सहकार्य आहे.[३]
अभियानाची उद्दिष्टे :-
१) पक्षपाती लिंगनिवडीच्या प्रक्रियेचे उन्मूलन करणे
२) मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे
३) मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे .
लक्ष्यगट :-
१) प्राथमिक - तरुण व नुकतीच लग्न झालेले जोडपे,गरोदर व स्तनदा माता , आई -वडील
२) दुय्य्म- तरुण ,किशोर, डॉक्टर्स ,दवाखाने ,निदान केंद्रे
३) तृतीय- इतर सामाजिक घटक
योजनेचे लक्ष्य -
१) जन्मावेळचे लींगगुणोत्तरात वार्षिक १० ने बी=वाढ करणे
२) मुलांच्या व मुलींच्या बालमृत्युदरातील तफावत जी २०११ मध्ये ८ होती ती २०१७ पर्यंत ४ करणे
३) मुलींमधील रक्तक्षय व कुपोषण निम्मे करणे
४) माध्यमिक शाळातील मुलींच्या पटनोंदणीचे प्रमाण जे २०१३- १४ मध्ये ७६% होते ते २०१७ पर्यंत ७९% करणे
५) २०१७ पर्यंत प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालये उभारणे .
६) २०१२ च्या बाललैंगिक शोषण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे.
७) 'बेटी बचाओ ,बेटी पढाओ ' अभियानासाठी जनजागृती करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे .
Reference
No comments:
Post a Comment